आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी गेला होता नवरदेव, तो घरी परतलाच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता- पिंपरी निर्मळ येथील अमोल दत्तात्रय घोरपडे (२५ वर्षे) या तरूणाचा नगर-मनमाड रस्त्यावरील टोलनाक्याजवळ सोमवारी रात्री अपघातात मृत्यू झाला. एकुलता एक असलेल्या अमोलचा १९ ला विवाह होणार होता. त्याआधी घडलेल्या या दुर्घटनेने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली. 


अमोल लग्नाचे कपडे घेण्यासाठी नातेवाईकांसह नगरला गेला होता. बाभळेश्वरहून रात्री ११ च्या सुमारास स्टार सीटी प्लस मोटारसायकलीवरुन घरी येत असताना टोलनाक्याजवळील गतिरोधकावर अज्ञात वाहनाच्या धडकेने त्याचा जागीच मृत्यू झाला. अमोलचे गुरुवारी लग्न होते. ग्रामपंचायत सदस्य विष्णू घोरपडे यांचा तो पुतण्या होता. 


टोलनाक्यावरील दिवे रात्री बंद असतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता, गतिरोधकांवर इंडिकेटर नाहीत. रात्री एकच लेन सुरु असते. त्यामुळे वाहनांची गर्दी होते. दुचाकीसाठी स्वतंत्र लेन नाही. अमोलच्या अंत्यसंस्कारानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी टोलनाका बंद करत तातडीने या बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली. या टोलनाक्याजवळ महिन्यापूर्वी अस्तगावचे माजी सरपंच कैलास जेजुरकर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांत संताप आहे. 

बातम्या आणखी आहेत...