आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नानी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात होतोय अवैध वाळू उपसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- खरडगाव येथील नानी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळूतस्करांची अरेरावी वाढल्याने खरडगाव येथील ग्रामस्थांनी तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन दिले आहे. अवैध वाळूउपसा न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, खरडगाव हे गाव शेवगावपासून अवघ्या चार किमीवर आहे. गावच्या शेजारून नानी नदीचे पात्र आहे. या नदीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. येथून रात्रीच्या वेळी शेकडो ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो अशी वाहने भरून जातात. या वाहनांमुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात नदीशेजारील जमीन वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी तहसीलदार, कामगार तलाठी तसेच महसूलच्या इतर अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, हा वाळूउपसा थांबलेला नाही. उलट वाळूतस्करी करणाऱ्यांची दहशत सुरू आहे. ते ग्रामस्थांशी वाद घालत असतात. वाळूतस्करांवर कायदेशीर कठोर कारवाई करावी; अन्यथा ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करतील, असा इशारा काकासाहेब लबडे यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर प्रशांत लबडे, श्यामराव ठोंबरे, जालिंदर लबडे, काहारी ठोंबरे, बबनराव लबडे, जालिंदर लबडे, दिलीप लबडे, विठ्ठल ठोंबरे यांच्या अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...