आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैधरित्या कत्तलीसाठी जाणारी सात गोवंश जनावरे पकडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- संगमनेर शहर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी कोल्हार-घोटी महामार्गावरील कासार दुमाला गावच्या शिवारात अवैधरित्या सात गोवंश जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करत असलेल्या दोन आरोपींसह जनावरांना ताब्यात घेतले. 


पोिलस निरीक्षक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील कोल्हार-घोटी महामार्गावरून कासारा दुमाला शिवाराजवळ काही अज्ञात आरोपींकडून टाटा एस (एम एच १२ जीटी २३६१) वाहनातून गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो. कॉ. तळेकर व इतर पोलिस कर्मचारी सदस्य घटनास्थळी पोहोचले असता दोन आरोपी नावे तन्वीर मुन्ना पठाण (कुरण रोड, संगमनेर) व शहाबाज मुख्तार बेग (मोगलपूर, संगमनेर) यांना साठ हजार रुपये किमतीची सात गोवंशी जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेत असताना आढळून आले. त्यानुसार शहर पोलिसांनी जनावरे ताब्यात घेऊन दोन्हीही आरोपींविरोधात गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...