आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूच्या सांगण्यावरून सख्‍ख्‍या भावाने व वहिनीने केला 5 वर्षीय चिमुरड्याचा खून, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - लहान भाऊ जमिनीच्या हिश्यात वाटेकरी होऊ व भविष्यात तो डोईजड होईल, असे सांगत सासूने कान भरले. यामुळे सख्खा भाऊ आणि वहिनीने पाच वर्षीय भावाचा निर्घृण हत्या केली. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना गतवर्षी तालुक्यातील भिंगाण येथे घडली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत शांतीलाल पाखरे, काजल पाखरे व संगीता तांबे (शांतीलालची सासू) यांना अटक केली आहे.

 

भिंगाण येथे वडील बापू पारखे यांच्या फिर्यादीवरून १३ सप्टेंबर २०१७ रोजी बाल्या बापू पारखे (५) या बालकाचा अपहरणाचा गुन्हा श्रीगोंदे पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. मात्र पोलिस तपासात या चिमुकल्याचा त्याच्याच सख्या भावाने व वहिनीने संपत्तीसाठी खून केल्याचे सिद्ध झाले.


पुढील स्‍लाइडवर इन्‍फोग्राफीक्‍सद्वारे जाणुन घ्‍या, वहिनीने व भावाने कसा केला चिमुरड्याचा घात...  

 

बातम्या आणखी आहेत...