आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 डाॅक्टरांच्या नावे परस्पर काेट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप; दाेन सहकारी बँकांविराेधात तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दाेन प्रतिष्ठित सहकारी बँकांनी जिल्ह्यातील चार डाॅक्टरांच्या नावे परस्पर काेट्यवधींचे कर्ज मंजूर केले, मात्र यापैकी एक रुपयाही संबंधितांना मिळाला नाही. या प्रकरणात अापली फसवणूक झाल्याचे लक्षात अाल्यानंतरही पाेलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नव्हती. अखेर वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्यानंतर साेमवारी या चाैघांची फिर्याद काेतवाली पाेलिस ठाण्यात साेमवारी दाखल करण्यात अाली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी सविस्तर फिर्याद घेण्याचे व गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू हाेते. 


डाॅ. भास्कर सिनारे (राहुरी), डाॅ. रवींद्र कवडे (श्रीरामपूर), डाॅ. विनाेद श्रीखंड (नगर) व अन्य एका डाॅक्टरने ही फिर्याद दिली अाहे. त्यात म्हटले अाहे की, या चाैघांसह अन्य २० डाॅक्टरांनी मिळून शहरात एका रुग्णालयाची सहकारी तत्त्वावर उभारणी केली हाेती. पण काही कारणांनी या चाैघांनी कालांतराने भागीदारी काढून घेतली. चार महिन्यांपूर्वी त्यांना नगर अर्बन बँक व शहर सहकारी बँकांकडून अचानक काेट्यवधी रुपये कर्जाच्या वसुलीसाठी नाेटिसा अाल्या. त्यामुळे ते अवाक् झाले. बँकेत जाऊन माहिती घेतली असता त्यांच्या नावावर हे काेट्यवधींचे कर्ज वितरित झाल्याचे त्यांना सांगण्यात अाले. मात्र या रकमेपैकी एक पैसाही या चाैघांना मिळालेला नसल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. 


अधिक चाैकशी केली असता भागीदारीत रुग्णालय उभारणीच्या वेळी या चाैघांनी रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे घेण्यासाठी कर्जाच्या प्रस्तावावर सह्या केल्या हाेत्या. पण कुठलेही तारण दिले नाही. तसेच कुठल्याही प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या केलेल्या नाहीत. तरीही त्यांच्या नावावर काेट्यवधींचे कर्ज वितरित करण्यात अाले. अामच्या परस्पर नंतर काही लाेकांनी ही कर्ज उचलले असावे, अशी या चाैघांची तक्रार अाहे. चार महिन्यांपूर्वीच हे प्रकरण लक्षात अाल्यानंतर डाॅ. सिनारे, डाॅ. कवडे, डाॅ. श्रीखंडे यांनी पाेलिसांकडे फिर्याद नाेंदवण्याचा प्रयत्न केला हाेता, मात्र त्या वेळी तक्रार घेतली नाही. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. त्यानंतर त्याची दखल घेण्यात अाली. अार्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या तक्रारीची शहानिशा केली. त्यात तथ्य अाढळल्यानंतर साेमवारी या चारही डाॅक्टरांना पाेलिस ठाण्यात बाेलावून घेण्यात अाले व त्यांच्याकडून सविस्तर फिर्याद घेण्यात अाली. मात्र या प्रकरणात काेणाकाेणावर गुन्हे दाखल करण्यात अाले हे पाेलिसांनी रात्री उशिरापर्यंत जाहीर केले नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...