आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डी- शिर्डीत येणाऱ्या भक्तांची कमिशन एजटांकडून फसवणुकीचे प्रकार सर्रासपणे घडत अाहेत. मलेशिया येथील अनिवासी साईभक्तांस एजंटाने असाच पूजेच्या दाेन ताटांसाठी चार हजार रुपये लाटल्याचे समाेर अाले अाहे. संबंधित साईभक्ताने याविरोधात पोलिसात धाव घेतल्याने संबंधित एजंटावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मलेशिया येथील साईभक्त होमना धनेश कुमार (मुळ रा. वायनाडू केरळ) हे साईबाबांच्या दर्शनासाठी साेमवारी कुटुंबीयासह आले होते. मंदिरात दर्शनास जात असताना त्यांना रस्त्यात राहुल अशोक पोटे तसेच गिरीधारी प्रेमजी सोनेजी यांनी अडवले. व्हीआयपी दर्शनाची सोय करून देतो, असे आमिष दाखवून त्यांनी या भाविकांना पूजेचे ताट घेण्याची सक्ती केली. दोन हजार रुपयाचे व्हीआयपी ताट घेतल्यास तुम्हाला पासची गरज नाही, थेट मंदिरात प्रवेश मिळेल, असे सांगून दाेन ताटांचे चार हजार रुपये उकळळे. तसेच चार नंबर गेटमधून भक्तांना मंदिर परिसरात सोडून दिले. आत गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या भक्तांच्या लक्षात येताच त्यांनी मंदिर सुरक्षा विभागाचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.