आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार संग्राम जगताप यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडात पोलिस कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह बाळासाहेब कोतकर व भानुदास कोतकर ऊर्फ बीएम यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडी संपल्याने त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तिघांचीही चार दिवसांची पोलिस कोठडी राखीव ठेवावी, असा अर्ज पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केला होता. त्यांच्या या अर्जाचा विचार करत तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, केडगाव हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेले संदीप गुंजाळ, संदीप गिऱ्हे, पप्पू मोकळे व बाबासाहेब केदार यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. 


आमदार जगताप यांना घटनेच्या दिवशी (७ एप्रिल) रात्री ११ च्या सुमारास अटक करण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब कोतकर व भानुदास कोतकर ऊर्फ बीएम यांना अटक करण्यात आली. तिघांच्याही पोलिस कोठडीत वेळोवेळी वाढ करण्यात आली. बुधवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तिघांचीही चार दिवसांची पोलिस कोठडी राखून ठेवत त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, असा अर्ज पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केला. त्यानुसार न्यायालयाने ितघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली. त्यातील मुख्य आरोपीने गुन्हाही कबूल केला, परंतु गुन्ह्याचे कारण, तसेच इतर फरार आराेपींचा शोध पोलिसांना अद्याप लागलेला नाही. मुख्य आरोपी गुंजाळ, गिऱ्हे, मोकळे व केदार यांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. या आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...