आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ड अध्यक्षासह शोरूम मालकाविरोधात खासदार गांधी यांची फसवणुकीची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- खासदार दिलीप गांधी यांच्या फिर्यादीवरून फोर्ड कंपनीचे अध्यक्ष, तसेच एमआयडीसीतील शोरूमचे संचालक व कर्मचाऱ्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी रविवारी सायंकाळी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शोरूम संचालकांनी २०१५ ची म्हणून २०१२ ची गाडी दिली, तसेच नियमापेक्षा अधिक आरटीओ टॅक्सची रक्कम वसूल करत २४ लाख ८७ हजार ७५० रुपयांची फसवणूक केली असल्याचे गांधी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 


फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अनुराग मेहरोत्रा, एमआयडीसी येथील सालसर फोर्ड शोरूमचे संचालक भूषण बिहाणी, गोवर्धन बिहाणी, अभिषेक बिहाणी, कर्मचारी सुशील ओसवाल व अजय रसाळ अशी आरोपींची नावे आहेत. खासदार गांधी यांनी सालसर फोर्ड शोरूममधून गाडी खरेदी केली. मात्र, शोरूम संचालकांनी २०१५ ची म्हणून २०१२ ची गाडी दिली. त्याचबरोबर नियमापेक्षा अधिक आरटीओ टॅक्स घेत आपली २४ लाख ८७ हजार ७५० रुपयांची फसवणूक केल्याचे गांधी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, भूषण बिहाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून काही दिवसांपूर्वीच खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार एमआयडीसी पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. 


खंडणी व फसवणुकीची परस्परविरोधी तक्रार 
खासदार गांधी यांनी बिहाणी यांच्याकडून २०१५ मध्ये फोर्ड कंपनीची इंडेव्हर गाडी खरेदी केली. हवा तो क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी गाडीची उशिरा नोंदणी केली. त्या दरम्यान गाडीबाबत तक्रारी केल्या. २९ सप्टेंबर २०१५ रोजी सुवेंद्र गांधी, सचिन गायकवाड, पवन गांधी व इतर लोकांनी शोरूमचे मॅनेजर व सेल्स मॅनेजर यांचे अपहरण केले. त्यांना मारहाण करून खंडणीची मागणी करण्यात आली. त्यावेळी संबंधितांनी शोरूममधून दहा इको स्पोर्ट्स गाड्याही नेल्या होत्या. त्यातील नऊच परत करण्यात आल्या, अशी तक्रार बिहाणी यांनी गांधी यांच्या विरोधात दिली आहे. अाता गांधी यांनी बिहाणी यांच्या विराेधात फसवणुकीची फिर्याद दिल्याने या प्रकरणाचे पुढे काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बातम्या आणखी आहेत...