आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबांच्या चरणी सव्वा किलो साेन्याच्या २ निरंजनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- आंध्र प्रदेश येथील एका साई भक्त परिवाराने साईबाबांच्या चरणी तब्बल सव्वा किलो वजनाच्या दोन सोन्याच्या निरंजन आरती दान स्वरूपात दिल्या आहेत. या दोन्ही सोन्याच्या निरंजनींचे वजन सव्वा किलो असून याची किंमत जवळपास पस्तीस लाख रुपये असल्याची माहिती साई संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. 


भाविकाच्या इच्छेनुसार या दोन्ही निरंजन साईबाबांच्या दिवसभरात होणाऱ्या चारही आरतींसाठी वापरण्यात येत आहे. दात्याचे नाव गुपित ठेवले आहे. देश- विदेशातील भाविकांच्या श्रद्धेतून सार्इ संस्थानला समृद्धी आली आहे. भाविकांनी मंदिर व पुजेच्या वस्तू सुवर्णमय करण्याचा जणू विडाच उचलला आहे. साई समाधीच्या कळसाला सोने लावल्यानंतर व सुवर्ण पादुका केल्यानंतर बाबांना ११० किलोचे सोन्याचे सिंहासन दान म्हणून आले. पाठोपाठ मंदिराच्या गाभा-यालाही सुवर्ण झळाळी आली. त्यानंतर सोन्याच्या वस्तू दान करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. जसजसा सोन्याचा दर उच्चांकी पातळी गाठतोय तसे भक्त सोन्याच्या वस्तू दान म्हणून बाबांना देत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...