आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृतुल्य मार्गदर्शक म्हणून बडे यांची उणीव भासेल : पंकजा मुंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- ऊस तोडणी कामगारांच्या क्षेत्रात माजी आमदार दगडू पाटील बडे यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या निधनाने या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. कौटुंबिक संबंध पाहता पितृतुल्य मार्गदर्शक म्हणून त्यांची उणीव भासेल, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी आमदार बडे यांना श्रद्धांजली वाहिली. 


तालुक्यातील चिंचपूर पांगुळ या त्यांच्या मूळ गावी शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव अॅड. कल्याण व धनंजय बडे यांनी अग्नी दिला. राज्याच्या विविध भागांतून कामगार चळवळीतील कार्यकर्ते, खासदार प्रीतम मुंडे, दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार केशवराव आंधळे, साहेबराव दरेकर व नारायण मुंडे, माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता गोल्हार, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, हर्षदा काकडे, अर्जुन शिरसाट, सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. बी. ई. आव्हाड, गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज, तारकेश्वर गडाचे आदिनाथ शास्त्री, सिद्धेश्वर संस्थानचे विवेकानंद शास्त्री, येळेश्वर देवस्थानचे रामगिरी महाराज, ज्ञानेश्वर कराळे महाराज, किशोर दराडे (नाशिक), डॉ. अजय फुंदे, तहसीलदार नामदेव पाटील आदी उपस्थित होते. मंत्री मुंडे म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथ मुंडे व दगडू पाटील बडे यांनी हातात हात घालून राजकारण केले. आपल्यालाही ऊसतोडणी कामगार, भगवानगड विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. वडीलकीच्या नात्यामुळे त्यांनी मुंडे साहेबांच्या निधनानंतर पित्यासमान खंबीर साथ दिल्याने दुःखातून आपण लवकर सावरलो. मुंडे-बडे कुटुंबीयाचे कौटुंबिक संबंध आगामी काळात तसेच राहतील. माजी मंत्री बबनराव ढाकणे म्हणाले, १९६२ पासून स्व. दगडू पाटील बडे व आपण एकत्रित काम केले. राजकीय विचारधारा वेगळी असूनही व्यक्तिगत पातळीवर शेवटपर्यंत ते सहकारी राहिले. खासदार गांधी व मुंडे यांनी त्यांच्या कार्याचा व स्पष्टवक्तेपणाचा आढावा घेतला. 

 

  • माजी आमदार दगडू बडे यांच्यावर अंत्यसंस्कार 

पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगूळ येथे माजी आमदार दगडू पाटील बडे यांना हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...