आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन; अनेक गावांतील ग्रामस्थ जागून काढत आहे रात्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोधेगाव- मुले पळवणारी टोळी आल्याच्या अफवा पसरल्याने गावागावांत सध्या भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, नागरिकांनी अशा कुठल्याही माहितीवर विश्वास न ठेवता संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्याला मारहाण न करता पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


काही दिवसांपूर्वी औरंगाबाद, बीड, जालना जिल्ह्यात आलेले अशा अफवांचे लोण आता नगर जिल्ह्यात आले आहे. सोशल मीडियातील या अफवांमुळे ग्रामस्थ सध्या रात्र-रात्र जागून काढत आहेत. अपरिचित, संशयास्पद, मनोरूग्ण, भटके, साधूवेशातील, स्री वेशातील, तसेच फेरीवाल्यांना धरुन मार देऊन पोलिसांच्या हवाली केले जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अाहे. 


दरम्यान, या अफवा कोण पसरवत आहे? सत्यता नक्की काय? हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणारे संदेश व्हायरल करू नये, केल्यास कठोर कारवाई केली जाईल, तसेच कोणी अनोळखी दिसल्यास त्यास मारहाण न करता पोलिसांच्या ताब्यात द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...