आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधाकृष्ण विखे मुख्यमंत्री व्हावेत; श्रीस्वामी समर्थ गुरुपीठाचे अण्णासाहेब मोरे यांची सदिच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्याची क्षमता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात असल्याने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा दिंडोरीप्रणित श्रीस्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केली.
प्रवरानगर येथे प्रवरा उद्योग समूहाच्यावतीने पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोरे बोलत होते. विरोधी पक्षनेते विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जि. प. अध्यक्ष शालिनी विखे, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे, आमदार भाऊसाहेब कांबळे, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र विखे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, डॉ.सर्जेराव निमसे, एम. एम. पुलाटे, काशिनाथ विखे, कैलासनाना तांबे, राजेश परजणे, धनश्री विखे, बाळासाहेब भवर, दीपक पटारे, भगवानराव पाचपुते, राहुल झावरे, करण ससाणे, राजेंद्र जाधव, नंदकिशोर राठी, कैलासबापू कोते, सुजित गोंदकर आदी यावेळी उपस्थित होते.


मोरे म्हणाले, बाळासाहेब विखे यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेऊन शेतकरी आणि सामान्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी सुखी तर जग सुखी हा विचार त्यांनी मांडला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अध्यात्माची जोड असल्यानेच हे घडू शकले. परिसराचे त्यांनी सोने केले.
आज जमिनीचे लहान लहान तुकडे झाल्याने त्यातून जगणे अवघड होऊन बसले आहे. शेतीबद्दल अनास्था निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांपुढे अनेक आव्हाने उभी आहेत. मुलांचे विवाह होत नाहीत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी खूप काम करावे लागेल. आधुनिक शेतीसाठी प्राथमिक शिक्षणात शेतीचा अभ्यासक्रम आणावा लागेल. शेती आधारित लघु उद्योग उभे करावे लागतील, असहीे मोरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...