आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासात्रळ (जि. नगर) - साखरेचे भाव कोसळत असताना उसाला एफआरपीनुसार भाव कसा मिळणार? नगदी पिकाची ही दैना असेल तर इतर पिकांचे काय? आम्ही सत्तेत असताना कापसाला पाच ते सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळत होता. सध्या तो ३८०० रुपयांवर आला आहे. या देशात सध्या खाणाऱ्यांचा विचार सुरू झाला आहे, पिकवणाऱ्यांचा विचार केला जात नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.
पी. बी. कडू पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांना समाजक्रांती पुरस्कार प्रदान करण्यात अाला, या वेळी ते बाेलत हाेते. आमदार दिलीप वळसे, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, रयतचे उपाध्यक्ष अरुण कडू, शोभाताई कडू, किरण कडू आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, शेतकरी अडचणीत असताना त्याची आर्थिक, सामाजिक ताकद कशी वाढेल, यासाठी समाजकारण, राजकारण करणे गरजेचे आहे. परंतु सध्या देशभर अडचणीचे चित्र आहे. साखरेचे भाव २९२० रुपयांवर आले. असेच भाव पडत राहिल्यास शेती अडचणीत येऊन भविष्यात १९७२ च्या दुष्काळातील लाल भाकरी खाण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
एकेकाळी लाल बावट्याचा जिल्हा असलेल्या नगरमध्ये भाजप आला कसा, हा प्रश्न आहे. परिवर्तनाच्या लाटेत नव्या पिढीला भगवा जवळचा वाटला. अर्थात तरीही शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ज्यांनी हयात घातली, त्या पी. बी. कडू पाटलांसारख्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यात साम्यवाद जिवंत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.