आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीपाद छिंदमची रविवारी तोफखाना पोलिस ठाण्यात हजेरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- छत्रपती शिवाजी महाराज व शिवजयंतीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम याची सशर्त जामिनावर सुटका झाली असली, तरी त्याला तोफखाना पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. छिंदम सध्या अज्ञात स्थळी आहे. तोफखाना पोलिसांनी त्याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

न्यायालयाने छिंदमची सशर्त जामिनावर सुटका केली. कोठडीतून बाहेर येताच छिंदम अज्ञात स्थळी रवाना झाला. रविवारी छिंदमला तोफखाना पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. सध्या तो परराज्यात असल्याचे समजते. त्यामुळे तेथील एखाद्या पोलिस ठाण्यात हजेरी लावता येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी निर्दाेष असून राजकीय अाकसापोटी मला गुंतवण्यात आले असल्याचे छिंदमने जामीन अर्जात म्हटले आहे. तो रविवारी तोफखाना पोलिस ठाण्यात हजेरी लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...