आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीची आत्महत्या, जामखेड येथील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड शहर- जामखेड शहरात शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी रेणुका राम काकडे (१६)हिने शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरातच ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. 


रेणुका राम काकडे (रा.विठ्ठल मंदिराजवळ, जामखेड) या नववीमधून दहावीत गेलेल्या शालेय विद्यार्थीनीने शुक्रवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्या रहात्या घरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत रेणुका ही इयत्ता नववीत असताना कळंब, (जि. उस्मानाबाद) येथे मामाच्या गावाला शिकत होती. मात्र दहावीला ती पुन्हा जामखेड येथे आई वडीलांकडे पुढील शिक्षणासाठी आली होती. १ जूनपासून ती जामखेड शहरातील एका विद्यालयात दहावीच्या नियमित जादा तासाला देखील जात होती. शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस असला तरी ती शाळेत गेली नव्हती. 


रेणुकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आपली रुग्णवाहिका घेउन घटनास्थळी हजर झाले परंतु तो पर्यंत ती मृत झाली होती. तिला कोठारी यांनी ग्रामिण रूग्णालयात आणत पंचनामा करुन वैद्यकीय अधीक्षक युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिले. तिच्या घराला पोलिसांनी टाळे ठोकले आहे. पोलीसानी त्याची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे पुढिल तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल बापू गव्हाणे करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...