आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंब्याच्या रसाने एकाच कुटुंबातील १० जणांना विषबाधा, अहमदनगरमधील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी ढोकेश्वर- पारनेर तालुक्यातील वडनेर येथील रहिवासी असलेल्या निचित कुटुंबातील १० जणांना आंब्याचा रस खाल्ल्याने विषबाधा झाली. या सर्वांना पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभिलाषा शिंदे यांनी सांगितले. 


या घटनेची माहिती मिळताच माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी पारनेरच्या या ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. विषबाधा झालेल्या या १० रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडून िदले होते. परंतु त्यांना पुन्हा त्रास झाल्याने त्यांना शुक्रवारी पुन्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या वडनेर येथील आंब्याच्या रसातून विषबाधा झालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींमध्ये - तुषार एकनाथ निचित (२०), सुनीता जालिंदर निचित (३०), सचिन दगडू निचित (३०), ज्योती शिवाजी निचित (२१), श्यामल शंकर निचित (२५) सोमनाथ बाळा निचित (१९), विनायक अशोक निचित (२०), पूजा बाळासाहेब निचित (२२), आदिनाथ विष्णू निचित (१८), अक्षय भाऊसाहेब वाझे (२०) यांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे त्यांच्यावर पुन्हा उपचार करण्याची वेळ आली आहे. सध्या दुसऱ्यांदा १० जणांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 


पथ्य न पाळल्याने पुन्हा उपचार 
वडनेर येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना आंब्याचा रस खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांच्यावर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अगोदरही उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. परंतु आहराचे पथ्य न पाळल्याने पुन्हा हा त्रास झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभिलाषा शिंदे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...