आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक शेख यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिस संरक्षण देण्याची फय्याज शेख यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गुंड प्रवृत्तीच्या अंडा गँगपासून वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने स्वत:ला व कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी मुकुंदनगर येथील प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक फय्याज शेख केबलवाला यांनी केली. मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात त्यांनी दिले आहे.

 

अंडा गँगची मुकुंदनगर भागात दहशत असून, या टोळीच्या सदस्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. नागरिकांना विनाकारण मारहाण करणे, पैसे हिसकावून घेणे, व्यसन करणे, खंडणी मागणे, अमली पदार्थांची हेरफेर करण्याचे काम या गँगच्या माध्यमातून सुरू असते. या कामात कोणी अडथळा आणल्यास या टोळीकडून त्यांना बेदम मारहाण केली जाते. त्यांची गुंडगिरी या भागात रोजरासपणे चालू आहे. निवेदनात म्हटले आहे की, माझा मुलगा शेख फरहान याला दोरीने बांधून हॉकी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या विरोधात १० सप्टेंबर रोजी भिंगार पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी अंडा गँगच्या सदस्यांनी माझ्या घरा समोर तलवारी, लोखंडी रॉड व दांडके घेवून मला माझ्या मुलास व कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घ्या अन्यथा मुलाला व मला जीवे मारण्याची धमकी दिली.

 

बातम्या आणखी आहेत...