आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहंमद पैगंबरांच्या पवित्र केसाच्या दर्शनासाठी शहरातील टकटी दरवाजा येथे भाविकांची गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.

नगर - मोहंमद पैगंबर जयंती (ईद मिलादुन्नबी) निमित्त सालाबाद प्रमाणे शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केसाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी विविध धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशात सात ते आठ ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र केस आहे. यामध्ये नगरचाही समावेश आहे. 

 

अहमदनगरसह औरंगाबाद, नागोर, बडीखाटू (राजस्थान), मध्यप्रदेश, काश्मीर आणि तुर्कस्तान देशातील इस्तंबूल या गावाचा समावेश आहे. नगरच्या मोघल कालीन इतिहासात हजरत महंमद पैगंबराच्या पवित्र केसांचा उल्लेख आलेला आहे. इराक इराण बॉर्डरवर असलेले मशहद (शहिदांचे गाव) शहरातून हजरत मोहम्मद पैगंबराचे पवित्र केस आणले आहेत. 


परंपरेनुसार फक्त मोहंमद पैगंबर जयंतीच्या दिवशी हे पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येत असल्याची माहिती पुजारी सय्यद बुऱ्हाण यांनी दिली. यावेळी मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महलला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, फुलांची सजावट करण्यात आली आहे. याच दिवशी नगर शहरातून झेंड्याची मिरवणूक काढण्यात येऊन, ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप झाले. दरम्यान, मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. झेंडा मिरवणुकीसह विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते. यामध्ये आरोग्य शिबिर, प्रसादाचे वाटप करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...