आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणातून फरार झालेले प्रेमीयुगूल शिर्डीत सापडले; पालकांनी दाखल केली ‘मिसिंग’ची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- तेलंगणा येथून दोन महिन्यांपासून फरार असलेल्या प्रेमीयुगुलास तेलंगणा पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे शिर्डीलगत सावळी विहीर परिसरात पकडले. या प्रेमीयुगुलास शिर्डी पोलिस ठाण्यात हजर केल्यानंतर त्यांना तेलंगणा येथे नेण्यात आले. 

तेलंगणा राज्यातील सिध्दीपेठ येथील एक प्रेमयुगूल दोन महिन्यांपूर्वी फरार झाले होते. प्रेमयुगुलाच्या पालकांनी त्यांच्या शोध घेऊनही ते मिळाल्याने राजगोपालपेठ पोलिस ठाण्यात ‘मिसिंग’ दाखल केली. पोलिसांनी रंजीतच्या मित्रांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मित्रांनीही प्रेमीयुगुलाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू दिले नाही. 

दरम्यान, या प्रेमीयुगुलातील तरुणाने शुक्रवारी घरमालकाच्या मोबाइलवरून त्यांच्या मित्राच्या मोबाइलवर फोन करून तेथील माहिती घेतली. मात्र, त्याच्या मित्राचा मोबाइल कॉल पोलिसांनी ट्रॅप केला होता. तरुणाच्या फोननंतर पोलिसांनी त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो शिर्डी परिसरात असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी शिर्डी गाठत घरमालक अनिल गांगुर्डे याच्या मोबाइल लोकेशनवरून सावळी विहीर परिसरात पोहोचले. गांगुर्डे यांना ताब्यात घेऊन घटनेची माहिती दिल्यानंतर गांगुर्डे यांनी हे प्रेमयुगूल आपल्याकडे भाडेकरू म्हणून रहात असल्याचे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...