आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर पोलिसांनी पकडला एक कोटींपेक्षा जास्त किमतीचा गांजा; आजवरची सर्वात मोठी कामगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- शहरात तब्बल एक कोटीपेक्षा जास्त किमतीचा गांजा पकडण्यात आला आहे. तोफखाना पोलिसांनी हा साठा पकडला आहे. एक कोटीपेक्षा जास्त किमतीचा गांजा पकडण्यात आल्याची ही बहुधा शहरातील आतापर्यंतची सर्वात मोठी घटना आहे. शहरात एवढा मोठा गांजाचा साठा पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही पोलिसांची मोठी कामगिरी असल्याने सध्या त्याची सर्वत्र चर्चा आहे.
  
एक बोलेरो आणि एक इनोव्हा जप्त
अहमदनगर पोलिसांनी सव्वा दोन किलोचे प्रत्येकी असे 286 बॉक्स जप्त केले आहेत.  एक बोलेरो आणि एक इनोव्हा गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी सीमा राजू पाचारिया (वय 46, रा. कासारदुमाळा ता. संगमनेर), शोभा कृष्णा कोकाटे (वय 28, रा. नालेगाव. जि. अहमदनगर), संदीप दिलीप अनभुले (वय 28 रा. घुमरी, ता. कर्जत), सागर भिमाजी कदम (वय 28 रा. आश्वी, ता. संगमनेर), गणेश निवृत्ती लोणारी (वय 36 रा. जोर्वे, ता. संगमनेर) यांना अटक कऱण्यात आली आहे. 
 
पकडण्यात आलेला मुद्देमाल
 
गांजा - 96, 52, 500 रुपये
इनोव्हा, बोलेरो - 17,00,000 रुपये
रोकड - 86 ,500
बॉक्स - 286
646 किलोग्रॅम
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...