आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केकताई येथील दुहेरी हत्याकांडातील संशयिताचे रेखाचित्र जारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- केकताई येथील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीचे रेखाचित्र एमआयडीसी पोलिसांनी जारी केले आहे. या संशयिताची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादातून हे हत्याकांड झाले असल्याचा पोलिसांना संशय आहे.
 
पिंपळगाव माळवी गावाच्या हद्दीतील केकताई जंगलात असलेल्या एका मठात दोन साधूंचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह गुरूवारी आढळले. सुदाम नामदेव बांगर (वडगाव गुप्ता) बाबासाहेब बाबुराव कराळे (शेंडी) अशी त्यांची नावे आहेत. नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.
 
तपासासाठी श्वानपथकाला पाचारण केले असता श्वान मठाच्या परिसरातच घुटमळला. त्यावरुन ओळखीच्या व्यक्तीनेच हत्याकांड केल्याचा पोलिसांना संशय आहे. संशयित म्हणून काही नावेही तपासात समाेर आली आहेत. त्यादृष्टीने तपास सुरू असून लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील, असे तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...