आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Special Story On IAS Officer Vijay Kulange At Orisa

\'टेलर\'पुत्राचा ओडिशामध्ये कामांच्या धडाक्याचा ट्रेलर, दबावाला न जुमानता हटवली अतिक्रमणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मराठी माणूस महाराष्ट्राबाहेर काम करू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात इतर राज्यातून लोक येऊन यशस्वी होतात. मात्र, यास अपवाद ठरले आहेत राळेगण म्हसोबा येथील टेलरपुत्र सध्या संबळपूर (ओडिशा) येथे मनपा आयुक्त असलेले विजय कुलांगे. त्यांनी संबळपूर येथील पक्की अतिक्रमणे हटवण्याची मोहीम कोणत्याही दबावाला बळी पडता यशस्वी करून दाखवली. त्यांच्या "पॉलिथीनमुक्त संबळपूर' योजनेचेही कौतुक झाले.

कुलांगे यांची इच्छा डॉक्टर होण्याची होती. मेडिकलला नंबर लागूनही घरच्या परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांचे वडील टेलरकाम, तर आई मजुरी करते. डीएड करून ते गळनिंब (ता. नेवासे) येथे जि. प. शिक्षक म्हणून रुजू झाले. २००१ मध्ये स्पर्धा परीक्षा देऊन ते सहायक विक्रीकर निरीक्षक झाले. २०१० मध्ये जामखेडचे तहसीलदार म्हणून ते नियुक्त झाले. तहसीलदार असताना त्यांनी विविध शासकीय योजना राबवल्या. राजस्व अभियानांतर्गत ९३० शिवाररस्ते केले. चौंडी बंधाऱ्यात पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री भ्रूणहत्या वाळूतस्करीविरुद्ध त्यांनी कणखर भूमिका घेतली.

२०११ मध्ये कुलांगे यूपीएससीत यशस्वी झाले. सध्या ते संबळपूर येथे मनपा आयुक्त आहेत. सुटीत ते नुकतेच गावाकडे आले आहेत. तिथल्या कामांबद्दल कुलांगे म्हणाले, संबळपूरमध्ये यापूर्वी कोणीही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली नव्हती. सरकारी मनपाच्या जागांवर असलेली मोठी अतिक्रमणे (एक एकरपेक्षा मोठ्या जागा ज्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहेत) माझ्या रडारवर होती. अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा संबंधितांना दिल्या. मात्र, दिलेल्या मुदतीत अतिक्रमणे निघाल्याने बुलडोझर लावून ती पाडण्यात आली. थोडाफार राजकीय दबाव आला. मात्र, कायदेशीर बाबींची पूर्तता आणि न्यायालयाच्या प्रक्रियेत सापडू नये, याचा दक्षता घेऊनच "होमवर्क' करत काम सुरू ठेवले. त्यामुळे ही मोठी अतिक्रमणे हटवताना काही अडचण आली नाही. उत्कृष्टतेचा ध्यास ठेवूनच मी काम करत असल्याचे कुलांगे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
पुढील स्लाईडवर वाचा, ओडिशात काम करण्यासाठी भरपूर संधी...