आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडाची बेकायदा कत्तल तरुणाच्या जिवावर बेतली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- बाभळीचे झाड अंगावर पडल्याने महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला.त्याच्या बरोबर असलेल्या दोन सख्या बहिणी गंभीर जखमी झाल्या. जांबुत शिवारात ही घटना घडली. दरम्यान, संबंधित वृक्षाची बेकायदा कत्तल करणाऱ्याने घटनास्थळाहून पळ काढला. ऋषिकेश शशिकांत कसबे असे मृत तरुणाचे नाव आहे. 

नांदूर खंदरमाळवाडी येथील ऋषिकेश साकूर येथील विद्या प्रबोधिनीत अकरावीत शिकत होता. महाविद्यालय सुटल्यानंतर तो दुचाकीवरुन घरी जात असताना रस्त्यात त्याने गावाजवळील पूजा आणि आरती गाडेकर या सख्या बहिणी असलेल्या मैत्रिणींना लिफ्ट दिली. जांबुत शिवारात कापले जात असलेले बाभळीचे झाड त्याच्या अंगावर पडले. झाडाखाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला, तर पूजा आणि आरती गंभीर जखमी झाल्या. जमलेल्या लोकांनी जखमी बहिणींना उपचारासाठी आळेफाटा (पुणे) येथील खासगी रुग्णालयात हलवले. 

अपघाताची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट घटनास्थळी आले. त्यांनी बाभळीचे झाड वाहून नेत असलेला टेम्पो ताब्यात घेतला. झाड तोडणारा मात्र पळून गेला. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताचा चुलतभाऊ राहुल कसबे याने केली आहे. झाड विना परवाना कापले जात होते. संबंधिताने झाड तोडताना योग्य ती खबरदारीदेखील घेतली नसल्याचे पुढे आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...