आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरमध्ये ट्रकखाली सापडून युवकाचा मृत्यू, संतप्त जमावाने जाळला ट्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - स्टेट बँकेच्या वळणावर ट्रकखाली सापडून अलफाज फारूक कुरेशी (वय 19, इदगाह मैदान) या युवकाचा मृत्यू झाला. मंगळवारी (6 ऑगस्ट) पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. नंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.
रमजान महिन्यातील सर्वांत मोठी जागण्याची रात्र सोमवारी होती. रात्री जागरण करून नमाज अदा करून शेअरी करण्यासाठी कुरेशी घरी निघाला होता. मोटारसायकलीवरून तो घराकडे येत होता. चांदणी चौकातून जात असताना समोरून येणाºया वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडून त्याचा ताबा सुटला. दुभाजकावर मोटारसायकल जोरात धडकली व तो रस्त्याच्या विरुद्ध दिशेला फेकला गेला. तेव्हा समोरून येणाºया ट्रकखाली (टीएन 28 पी 7867) सापडून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, चालक ट्रक अपघातस्थळी सोडून पसार झाला होता. कुरेशीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. हा ट्रक गुजरातहून कापूस घेऊन तामिळनाडूकडे जात होता. पहाटे चारच्या सुमारास ट्रक पेटल्याची माहिती मिळाल्याने महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी आले. तब्बल दहा गाड्यांचा वापर केल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास आग शमवण्यात आली.