आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aadhar Card Receive Time Officer Demand Money Issue At Nagar

आंधळं दळतंय... पैसे दिल्‍याशिवाय आधारकार्ड मिळत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शासकीययोजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आता आवश्यक झाले आहे. आधारकार्ड वनिामूल्य दिले जात असताना आता त्यासाठी सर्वसामान्यांना चक्क पैसे मोजावे लागत आहेत.

केंद्र सरकारची आधारकार्ड योजना ही महत्त्वाची मानली जाते. यावर सरकार दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करते. गॅस िसलिंडरचे अनुदान, राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृती, जन-धन योजना यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असते. आधारकार्ड देण्यासाठी शहरात विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. कार्डवाटपाचे काम खासगी संस्थांना देण्यात आले आहे. आधारकार्ड वाटपात दोन वर्षांपूर्वी राज्यात नगर शहर क्रमांक एकवर होते. शहरात त्यावेळी सुमारे लाखांहून अधिक नोंदणी झाली होती. जिल्ह्यात ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

एकीकडे सरकार आधारकार्डची सक्ती करत असताना दुसरीकडे मात्र शहरातील मंगलगेट परिसरातील एका आधारकार्ड केंद्रात कार्ड घेण्यासाठी नागरिकांना ५० रुपये द्यावे लागत आहेत. शहरात सध्या केवळ दोन-चार आधार कार्ड केंद्र सुरू आहेत. ही केंद्रही कधी सुरू, तर कधी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना या केंद्रातून त्या केंद्राकडे हेलपाटे मारावे लागतात.
केंद्रचालकावर कारवाई करा
^आधारकार्डकाढण्यासाठी गेल्यावर संबंधित केंद्रातील कर्मचारी पन्नास रुपयांची मागणी करतात. घेतलेल्या पैशांची कुठलीही अधिकृत पावती दिली जात नाही. आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांना तीन-तीन तास ताटकळत उभे रहावे लागते. वास्तविक आधारकार्ड हे कुठलेही शुल्क घेता दिले जाते. मात्र, या केंद्रावर राजरोसपणे पैशांची मागणी केली जाते. अडवणूक करणाऱ्या केंद्रचालकावर प्रशासनाने तातडीने कारवाई करायला हवी.” अमितिशंदे, नागरिक,केडगाव.