आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अाधार’चे सर्व्हर डाऊनच; 31 केंद्र बंद, नागरिकांच्‍या रांगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सरकार मान्य८२ आधार केंद्रांपैकी तब्बल ३१ केंद्र बंद असून, उर्वरित जी सुरू आहेत तेथील सर्व्हर कधी बंद असल्याने आधार कार्डसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यातच शेतकरी कर्जमाफीसाठीचे अर्ज भरण्याची १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. मुदत संपण्यास काही दिवस शिल्लक असतानाच जिल्ह्यातील अनेक आधार केंद्र बंद असल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. राज्याचे पालकसचिव आशिषकुमार सिंह यांनी बुधवारी अाधारच्या कामांचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 
 
कुठलेही अनुदान, सरकारी सवलतींचा लाभ, महाविद्यालयीन प्रवेश, गृह खरेदी-विक्री, दाखले, बँकेत खाते, रेशनकार्ड, मतदानकार्ड, विजेचे नवे मीटर, विमा योजना, लाभ यासह कुठल्याही शासकीय खासगी कामांसाठी आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्ड नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेली ८२ आधार नोंदणी केंद्रापैकी ३१ केंद्र बंद आहेत. ७० खासगी आधार नोंदणी केंद्र आहेत. त्यातील काही बंद आहेत. 
 
नगर शहरात प्रशासनाचे नियंत्रण असलेली सहा आधार कार्ड नोंदणी केंद्र आहेत. नगर, पाथर्डी, श्रीरामपूर, शेवगाव, नेवासे, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीगोंदे, कर्जत, पारनेर जामखेड येथेही केंद्र आहेत. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून आधार केंद्रावरील सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक केंद्र बंद करण्यात आली आहेत. काही ठिकाणी सर्व्हरमुळे आधार लिंक होण्यास विलंब लागत असल्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. अनेक केंद्रांवर आधार नोंदणीसाठी रांगा लागल्या आहेत. त्यामुळे केंद्रावर अनेकदा केंद्रचालक नागरिकांत वाद होताना दिसतात. 
 
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन ऑफलाइन अर्ज देण्यात येत आहेत. हे अर्ज आधार केंद्रातून मिळत आहेत. वास्तविक हे अर्ज मोफत देण्याचे सरकारचे आदेश आहेत, तरीदेखील काही केंद्रांवर अर्जासाठी पैसे घेतले जातात. सरकारमान्य ३१ आधार केंद्र बंद असल्यामुळे सध्या जे केंद्र सुरू आहेत, त्या केंद्रावर नागरिकांसह शेतकरीही गर्दी करत आहेत. त्यातच खासगी आधार केंद्र सुरू असले, तरी त्यावर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्यामुळे तेही मनमानी करत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 
 
दरम्यान, राज्याचे पालकसचिव आशिषकुमार सिंह यांनी बुधवारी शेतकरी कर्जमाफीची ऑनलाइन प्रक्रिया आधार केंद्रांचा आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. 
बातम्या आणखी आहेत...