आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 25 लाख सदस्य नोंदणीचा ‘आप’चा संकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आम आदमी पक्षाने जिल्ह्यात 25 लाख सदस्य बनवण्याचा संकल्प केला आहे. लॅपटॉप व टॅब्लेटच्या माध्यमातून ऑनलाइन ‘फिरत्या नोंदणी मोहिमे’ला शनिवारी रात्री सुरुवात करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हा सचिव प्रसाद सैदाणे यांनी दिली.

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाडिया पार्क येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सदस्य नोंदणी मोहिमेला प्रारंभ केला. ऑनलाइन नोंदणी करणार्‍या सदस्यांची थेट दिल्लीतील पक्षाच्या मुख्य कार्यालयात नोंद होणार आहे. एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सदस्यांची नोंदणी करण्यासाठी दोन मोबाइल व्हॅनची व्यवस्था केली आहे. या व्हॅन मतदारसंघात फिरून सदस्यनोंदणी करणार आहेत. लॅपटॉप असणार्‍या सदस्यांनी स्वतंत्र फिरुन सदस्य नोंदणीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पक्षाचे 25 लाख सदस्य बनवण्याचा संकल्प पदाधिकार्‍यांनी केला. यावेळी अँड. कारभारी गवळी उपस्थित होते.