आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Rebal MLA Binni Met Anna, Discussed Various Points

'आप'चे बंडखोर आमदार बिन्नी यांनी घेतली अण्णांची भेट, अनेक मुद्द्यांवर केली चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करून आम आदमी पक्षाच्या विरोधात बंड पुकारणारे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी रविवारी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन बंदद्वार चर्चा केली. केजरीवाल सरकारविरुद्ध 27 जानेवारीपासूनचे उपोषण काही काळ स्थगित करण्याचा सल्ला अण्णांनी दिल्यानंतर उपोषणाचा निर्णय मागे घेत असल्याचे बिन्नी यांनी जाहीर केले.


केजरीवाल सरकारने दिल्लीतील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. 700 लिटर पाण्याच्या आश्वासनास हरताळ फासला. वीज बिलांबाबतही फसवणूक केल्याचे सांगत बिन्नी यांनी केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत ते हुकूमशहा झाल्याचा आरोप केला होता.


दरी मिटवण्यासाठी प्रयत्न
दिल्ली सरकारचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याचे दृश्य परिणाम पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल़ बिन्नींशी असलेले मतभेद दूर करण्यासाठी केजरीवाल यांच्याशी चर्चा करू, असे अण्णांनी सांगितले.