आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको बापू सर्मथकांचा, त्रास मात्र सर्वसामान्यांना..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आसाराम बापू यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांच्या सर्मथकांनी बुधवारी प्रेमदान चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला. रास्ता रोकोदरम्यान आंदोलक व नागरिकांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आसाराम बापू यांच्या अटकेच्या निषेधार्थ योग वेदांत सेवा समिती व त्यांच्या सर्मथकांनी नगर-मंनमाड रस्त्यावरील प्रेमदान चौकात दुपारी साडेबारा वाजता अचानक केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. बापू सर्मथकांनी यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आसाराम बापू यांच्या सर्मथनाचे फलक आंदोलकांच्या हातात होते. आंदोलन सुरू असताना एकही पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी नव्हता. रास्ता रोकोमुळे वैतागलेले वाहनचालक आणि आंदोलकांत खडाजंगी झाली.

आंदोलनात श्रीयोग वेदांत समितीचे पदाधिकारी महेश देशमुख, सिध्देश शेळके, रामनाथ थोरात, अशोक झांबरे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलनानंतर पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, आसाराम बापू यांचे जगभरात पाच कोटी भाविक आहेत.