आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhay Agarkar News In Marathi, BJP, Lok Sabha Election, Divya Marathi

प्रचारफेरीतून भाजप नेते आगरकरांना हाकलले, मनपा निवडणुकीत पैसे घेतल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अँड. अभय आगरकर यांना पक्षाच्याच प्रचारफेरीतून हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी दुपारी घडला. महापालिका निवडणुकीत पैसे घेऊन उमेदवारी देणारे आगरकर हे भाजपचे नव्हे, तर राष्ट्रवादीचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना गांधी यांच्यासाठी मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही, असा आरोप करत भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष भिमराव आव्हाड यांनी आगरकर यांना प्रचारफेरीतून हाकलून दिले. शिवाय त्यांच्या विरोधात प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह उपोषण करण्याचा इशाराही दिला.
भाजपने गुरूवारी दुपारी सावेडीतील पाइपलाइन परिसरात प्रचारफेरी काढली. फेरीत शंभर-दीडशे कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकविरा चौकात आलेली ही फेरी आव्हाड यांनी थांबवली. आगरकर जोपर्यंत फेरीतून बाहेर जात नाहीत, तोपर्यंत फेरी पुढे जाऊ देणार नाही. महापालिका निवडणुकीत पैसे घेतले नाहीत, अशी शपथ आगरकर यांनी घ्यावी, असे आव्हाड म्हणाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अनेकांनी आव्हाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर आगरकर प्रचारफेरी सोडून निघून गेल्यानंतरच फेरी पुढे गेली.