आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनिर्वाचित महापौर अभिषेक कळमकर आज स्वीकारणार पदभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नवनिर्वाचित महापौर अभिषेक कळमकर शुक्रवारी सकाळी पदभार स्वीकारणार आहेत. त्यांची जूनला महापौरपदी निवड झाली. परंतु पदभार स्वीकारण्यासाठी त्यांनी शुक्रवारचा मुहूर्त काढला. पदभार घेतल्यानंतर ते महापालिकेच्या कारभारात सक्रीय होतील. नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी ते काय उपाययोजना करतात, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

मनपाच्या तिजोरीत खडखडाट असून कळमकर त्यातून कसा मार्ग काढतात, हे बघावे लागेल. जकात पारगमन वसुली बंद झाल्याने मनपासमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. ऑगस्टमध्ये एलबीटी बंद होणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचे पगार देणेही कठीण होणार आहे. या परिस्थितीतून कळमकरांना मार्ग काढावा लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...