आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Absent Rebellious Councillors Will Be Face To Law

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह: बंडखोर नगरसेवकांवर येणार कायद्याचा बडगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश (व्हीप) डावलून विरोधात मतदान केल्यास अथवा अनुपस्थित राहिल्यास संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे.
महापालिका निवडणूक झाल्यानंतर सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांची पाच वर्षांसाठी गटनोंदणी केलेली आहे. त्यामुळे गटनेत्याचे आदेश मान्य करणे गटनोंदणी झालेल्या नगरसेवकांवर बंधनकारक आहे, तसे प्रतिज्ञापत्र या नगरसेवकांनी दिलेले आहे. त्यामुळे येत्या जूनला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून विरोधात मतदान करणाऱ्या अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांना कायदेशीर लढ्यास तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक १५ डिसेंबर २०१३ मध्ये पार पडली. त्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गटनोंदणी केली. त्यात राष्ट्रवादीने नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी अपक्ष यांची शहर विकास आघाडी, सेनेने शिवसेना अपक्ष विकास आघाडी, काँग्रेसने भारातीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडी, भाजपने भारतीय जनता पार्टी मनसेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने आपल्या नगरसेवकांची गटनोंदणी केलेली आहे. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनर्हता नियम १९८७ मधील नियम ३, नुसार गटनोंदणी झालेल्या नगरसेवकांवर पक्षादेश पाळणे बंधनकारक आहे.

या नियमानुसार येत्या जूनला होणाऱ्या महापौर निवडणुकीत विरोधात मतदान करणाऱ्या अथवा अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्तांना तसे अधिकार आहेत. विशेष म्हणजे गटनोंदणी करताना प्रत्येक नगरसेवकाने पक्षादेश पाळण्याबाबचे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना-भाजप काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने महापौरपदावर दावा करत नगरसेवकांची पळवापळवी सुरू केली आहे. अनेक नगरसेवकांना सहलीवर पाठवण्यात आले आहे.
युती आघाडी आपल्याकडे अपेक्षित संख्याबळ असल्याचा दावा करत आहे. हे संख्याबळ जमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे जूनला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून विरोधात मतदान करणे, तसेच पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहण्याचा प्रकार घडणार आहे. तसे करणाऱ्या संबंधित नगरसेवकांना मात्र पुढील कायदेशीर लढाईला तोंड द्यावे लागणार आहे.
असे आहे नगरसेवकांचे प्रतिज्ञापत्र
ज्याकालावधीसाठी मी निवडून आलो आहे, त्या संपूर्ण कालावधीत मी माझ्या पक्षाशी बांधिल आहे. पक्षाचे गटनेते वेळोवेळी जे व्हीप जारी करतील, त्याचे पालन करण्यात कोणताही कसूर करणार नाही. पक्षाचा कोणताही नगरसेवक अथवा जनहिताच्या विरोधात गैरवर्तन करणार नाही. पक्षादेश पाळल्यास माझे गटनोंदणीतील सदस्यत्व रद्द करण्याचा त्या अनुसंघाने नगरसेवक पदावरून अपात्र करण्यासाठी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अधिनियम १९८६ नियम १९८७ नुसार योग्य त्या अधिकाऱ्यांकडून कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार माझ्या पक्षाला राहील. हे प्रतिज्ञापत्र माझ्या मर्जिने, स्वेच्छेने, तसेच कोणाच्याही दडपणाखाली येता लिहून देत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अनुपस्थितीसाठी हवी कायदेशीर परवानगी...