आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी काेरी स्कॉर्पिओ झाडाला धडकली; राहूरी तालुक्‍यातील आठ ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर चक्काचूर झालेली स्काॅर्पिअाे गाडी क्रेनच्या साह्याने हटवण्यात अाली. - Divya Marathi
अपघातानंतर चक्काचूर झालेली स्काॅर्पिअाे गाडी क्रेनच्या साह्याने हटवण्यात अाली.
राहुरी (जि. नगर) - नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी येथील पेट्रोल पंपासमोर नवी काेरी स्काॅर्पिअाे झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले, तर दोघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत राहूरी तालुक्यातील वळण व वरवंडी गावचे अाहेत.

कोल्हारकडून राहुरीकडे जाताना रस्त्यात असलेल्या एका दुचाकीस्वाराला वाचवताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ही स्कॉर्पिओ सरळ महामार्गावरील झाडावर धडकली.

अरुण थोरात, महेश पवार, सुरेश खुळे, महेश कोळसे, नाथा डमाळे, सतीश शेळके, सचिन ढगे, सतीश गोसावी अशी अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यातील सचिन ढगे हे राहुरी तालुक्यातील वरवंडी गावचे सरपंच आहेत. उर्वरित सर्व जण  वळण येथील रहिवासी आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, झाड मोडून पडले आणि चार पलट्या घेऊन गाडीही रस्त्याच्या खाली जाऊन धडपली. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ नवीनच घेतली होती. त्यावर पासिंग क्रमांक टाकण्यात आलेला नव्हता. केवळ (एमएच १६, पीसी १९२) असा शोरूमचा तात्पुरता क्रमांक टाकलेला होता.

 
 
बातम्या आणखी आहेत...