आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कूपनलिका दुर्घटना घडल्यास कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. अशा घटनांना कारणीभूत ठरणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी सांगितले. पाण्यासाठी विहिरी, कूपनलिका, मोठे हौद खोदण्यात येतात. परंतु ते वापरात नसल्यास नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोमवारी (9 जुलै) राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील कूपनलिकेत मनोज घोरपडे हा मुलगा पडला. त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले. तथापि, अशा दुर्घटना हलगर्जीपणामुळे होतात. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार अशा बाबींसाठी कठोर शिक्षा होऊ शकते. या घटना पुढील काळात घडू नये यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. गावात, तसेच परिसरात अशा धोकादायक विहिरी, कूपनलिका आढळल्यास तातडीने तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.