आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकातील अपघातात नगरच्या एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जागीच ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या अपघातात नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जण ठार झाले तर जण जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर टेम्पो ट्रॅव्हलर आदळल्यामुळे हा अपघात झाला. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे रुईछत्तीशी ग्रामस्थांनी दिवसभर आपले व्यवहार बंद ठेवून शोक व्यक्त केला.

रुईछत्तीशी येथील इकबाल हसन शेख हे कुटुंबीय नातेवाईकांसोबत टेम्पो ट्रॅव्हलरने म्हैसूर येथे एका लग्नासाठी जात होते. बुधवारी दुपारी गावातून निघाल्यानंतर सोलापूरमार्गे विजापूरला ते गेले. तेथून पुढे विजापूर होस्पेट या राष्ट्रीय महामार्गाला (एनएच १३) लागले. म्हैसूरडे जात असताना बुधवारी रात्री कोप्पल जिल्ह्यातील कुस्तगी गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या एका ट्रकवर टेम्पो ट्रॅव्हलर आदळली. त्यात ठार झाले तर जण जखमी झाले. त्यापैकी नाविदा इकबाल शेख ३५ यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृतांची नावे
इकबाल हसन शेख (४२), तय्यब इस्माइल शेख (१५), मदिना ईस्माईल शेख (४५, रुईछत्तीशी), राजू हुसेन शेख (४५, थेरगाव मांदळी) चालक युनूस ताहीर शेख (३५, भिंगार) या पाच जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.