आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅपेच्या धडकेत पत्रकार जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बेशिस्त व अवैध अ‍ॅपेरिक्षांवर कारवाईची मोहीम शहर वाहतूक शाखेने सुरू केली आहे. परंतु अद्याप पॅगोचालकांना शिस्त लागलेली नाही. एका पॅगोचालकाने पाठीमागून दिलेल्या धडकेत मोटारसायकलवर असलेले बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार सुभाष चिंधे जखमी झाले.
हा अपघात मंगळवारी रात्री सावेडी नाक्याजवळच्या रिरोन्सी होंडा शोरुमसमोर घडला. चिंधे यांना तत्काळ तारकपूर परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.