आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीहून शनिशिंगणापुरला निघालेल्या भाविकांच्या जीपला अपघात; 2 ठार, 11 गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- शिर्डीहून शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या जीपला राहुरीत अपघात होऊन 2 जण ठार तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे भाविक गुजरात, नाशिक, यवतमाळ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोलानाथ पाचारे (रा. वणी) व विवेकानंद आचल (रा. हैदराबाद) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

 

शिर्डीला आलेले हे भाविक जीपमधून शनिशिंगणापूरकडे निघाले होते. अहमदनगर-मनमाड महामार्गाने जात असताना राहुरीत रस्त्यात उभ्या असलेल्या एका वाहनावर जीप आदळून हा अपघात झाला. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत लगेच मदत केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...