आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Divya Marathi, Nagar, Motorcycle

मोटारसायकल-एसटी बस अपघातात एकजण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - भरधाव वेगातील मोटारसायकलची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला धडक बसून एकजण ठार, तर एक जखमी झाला. ही घटना अकोले तालुक्यातील सुगाव फाट्यानजीक शुक्रवारी (6 जून) दुपारी 1.30 वाजता घडली.

संगमनेरहून अकोल्याकडे जात असलेली अकोले आगाराची बस (एमएच 12 सीएच 8727) जुन्या सुगाव फाट्यावर प्रवासी उतरण्यासाठी बसचालकाने थांबवली होती. हा नेहमीचा थांबा नसल्याने पाठीमागून कळसहून येणारी भरधाव मोटारसायकल बसवर आदळली. या अपघातात मोटारसायकलवर मागे बसलेला अमोल सूर्यभान गोडसे (22) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोन्ही जखमींना नागरिकांनी तातडीने इंडिकातून संगमनेरला उपचारासाठी हलवले. मात्र, अमोल गोडसे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यावर सायंकाळी उशिरा कळस बुद्रूक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राथमिक शिक्षक शांताराम ढगे यांचा अमोल भाचा असून तो मूळचा चास पिंपळदरी येथील आहे. सुटीत तो कळसला मामाकडे आला होता. दरम्यान, घटनास्थळी बस सोडून पळून गेलेला चालक बाजीराव गायकवाड (शेकईवाडी, अकोले) यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.