आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्याहून परतताना सहल बसला अपघात; तिघे ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - काष्टी (ता. श्रीगोंदे) येथील परिक्रमा शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांची सहल गोव्याहून परत येत असताना रविवारी पहाटे झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाले, तर सुमारे १५ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सातारा जिल्ह्यात घडली. "परिक्रमा' ही संस्था माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची आहे.

अभिजित पंडित पेठकर (२२, दौंड, जि. पुणे) हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, संस्थेचा शिपाई सूर्यकांत सुदाम कानडे (२५, पेडगाव, ता. श्रीगोंदे), चालकाचा सहायक आकाश बसवराज बिराजदार (१८, नेहरूनगर, पिंप्री, पुणे) यांचा मृतांत समावेश आहे. या इंजिनअरिंग महाविद्यालयातील ५० विद्यार्थी ४ दिवसांपूर्वी गोव्याला सहलीसाठी गेले होते. ते परतत असताना कराडजवळ उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीत विद्यार्थ्यांच्या लक्झरी बसची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला धडक बसली. ओव्हरटेक करताना ही दुर्घटना घडली. डावीकडील पत्रा फाटल्याने बसमधील तिघे जण बाहेर फेकले गेले व बसच्याच चाकाखाली चेंगरून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. घटनास्थळापासून जवळच पाचपुतेंची कन्या रूपाली व जावई धैर्यशील पाटील यांचे निवासस्थान आहे.

'परिक्रमा'त श्रद्धांजली
अपघातात ठार झालेला विद्यार्थी अभिजित पेठेकर व शिपाई सूर्यकांत कानडे यांच्यावर अनुक्रमे दौंड व पेडगाव येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर परिक्रमा शैक्षणिक संकुलात शोकसभा होऊन अनेकांच्या उपस्थितीत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.