आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा तोळ्याची सापडलेली अंगठी केली खातेदाराने परत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अर्बन बँकेचे खातेदार प्रसाद देशपांडे यांनी सुरक्षागृहात सापडलेली सव्वा तोळ्याची अंगठी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे जमा केली. देशपांडे हे सुरवी बँडचे संचालक आहेत.
देशपांडे मंगळवारी सकाळी अर्बन बँकेच्या सुरक्षागृहातील त्यांचे काम आटोपून परत निघाले होते. सोन्याची अंगठी असलेली डबी सुरक्षागृहात पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्रामाणिकपणे त्यांनी ती डबी बँकेच्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली. अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता ही अंगठी बँकेचे खातेदार विष्णू छिंदम यांची असल्याचे आढळून आले. छिंदम यांच्याशी संपर्क साधून अंगठी त्यांच्या हाती देण्यात आली. सव्वा तोळ्याच्या या अंगठीची किंमत ३० हजार रुपयांच्या घरात आहे. देशपांडे यांचे दिलीप गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी, सतीश शिंगटे, एम. पी. साळवे, राजेंद्र मुनोत, राजेंद्र रोकडे, प्रशासकीय अधिकारी विलास बडवे यांनी अभिनंदन केले.