आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी निष्पन्न होऊनही मोकाटच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - एकाशिक्षिकेला येत असलेल्या अश्लील एसएमएससंबंधी पोलिसांकडे दोन वर्षांपूर्वी फिर्याद नोंदवली. आरोपी निष्पन्न होऊनही पोलिसांनी अजून कोणालाच अटक केली नाही. शिक्षिकेने उच्च न्यायालय महिला आयोगात तक्रारी केल्या, तरीही गुन्ह्याचा तपास संथ गतीने सुरू आहे. दोन वर्षांच्या कालावधीत तपासी अधिकारी बदलत असल्यामुळे फिर्यादी महिलेला माहिती मिळत नाही. त्यामुळे नव्याने आलेल्या पोलिस अधीक्षकांकडे या शिक्षकेने दाद मागितली आहे.

पाथर्डी तालुक्यातील प्राथमिक शाळेत नोकरीला असलेली फिर्यादी शिक्षिका विवाहित आहे. फिर्याद दिली तेव्हा ती तालुक्यातील एका गावात नोकरीला होती. काही दिवसांनी तिच्या पतीच्या मोबाइलवर अश्लील एसएमएस येऊ लागले. त्यामुळे ऑक्टोबर १३ मध्ये त्यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मोबाइल नंबरवरून शोध घेतला. तपासात एक महिला संदेश पाठवत असल्याचे आढळले. नंतर तपास संथ झाला. उलट एसएमएस यायचे बंद झाले, असे लिहून द्या, असे पोलिस म्हणू लागले. पोलिसांनी तेव्हा दाखल केलेला गुन्हाही अदखलपात्र स्वरूपाचा होता.

त्यामुळे शिक्षिकेने उच्च न्यायालय महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यांनी स्थानिक यंत्रणेला तपास कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पुन्हा शिक्षिकेची फिर्याद घेऊन विनयभंग माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. नंतर काही काळ तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेंतर्गत मोबाइल सेलकडे आला.

नंतर पुन्हा पाथर्डीला वर्ग झाला. पण तपासात काहीच प्रगती होत नाही, अशी फिर्यादी शिक्षिकेची तक्रार आहे. त्यामुळे तिने पोलिस अधीक्षकांना निवेदन देत तपासाला वेग देण्याची मागणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...