आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबजेलमध्ये आरोपीची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बबन दामोधर साळवे (वय २७, पिंपळगाव कौडा) याने गळफास घेऊन मंगळवारी येथील सबजेल कारागृहात आत्महत्या केली. साळवे याने एका विवाहित महिलेचा कुऱ्हाडीने वार करून खून केला होता. त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून न्यायालयात हा खटला सुरू आहे.
कारागृहातील आरोपी व कैद्यांच्या दुपारच्या हजेरीत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी साळवे हजर नसल्याचे लक्षात आले. कारागृहातील पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेतला. साळवे याला सकाळी धान्याच्या गोडावूनमध्ये कामासाठी पाठवले होते. पोलिसांनी गोडावूनचा दरवाजा उघडून त्याचा शोध घेतला असता, साळवे याने सुतळीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

साळवे पिंपळगाव कौडा येथे राहत होता. तीन महिन्यांपूर्वी त्याने एका विवाहित महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीच्या आत्महत्येची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक वाय. डी. पाटील, पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हणपुडे कारागृहात आले. तपास कोतवाली पोलिस करत आहेत.