आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर : पत्‍नी घराबाहेर दिसली; नवऱ्याने गुप्‍तांगावर फेकले अ‍ॅसिड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावसाहेब याच्‍या पत्‍नीवर रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. - Divya Marathi
रावसाहेब याच्‍या पत्‍नीवर रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

अहमदनगर - आपल्‍या पत्‍नीला रात्री घराबाहेर पाहून संतप्‍त झालेल्‍या एका नवऱ्याने तिच्‍या गुप्‍तांगावर अॅसिड फेकले. यात संबंधित महिलेला गंभीर इजा झाली असून, तिच्‍यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री जिल्‍ह्यातील खांडके गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेचा नवरा रावसाहेब चिमटे याला अटक केली.
अशी घडली घटना
रावसाहेब याला दारूचे व्‍यसन आहे. मंगळवारी रात्रीसुद्धा तो मद्यधुंद अवस्‍थेत घरी आला. दरम्‍यान, त्‍याला आपली पत्‍नी घराबाहेर झोपल्‍याचे दिसले. त्‍यामुळे त्‍याने रागाच्‍या भरात तिच्‍या गुप्‍तांगावर अॅसिड टाकले. आरडाओरडा केल्यानंतर रावसाहेब पळून गेला. शेजाऱ्यांनी त्‍याच्‍या पत्‍नीला नगर येथील जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले.