आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या युवक-युवतींना मिळणार अभिनयाचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अभियनयाच्या क्षेत्रात करिअर करणार्‍या नगरच्या युवक-युवतींसाठी पुणे येथील चॉईस फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट लवकरच ‘हाऊ टू फेस कॅमेरा’ आणि शॉर्टफिल्म मेकींग कोर्स सुरू करणार आहे.

चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍यांना धडे घेण्यासाठी पूर्वी मुंबई-पुण्याला जावे लागत होते. त्यात वेळ व पैसा मोठय़ा प्रमाणात खर्च व्हायचा. सामान्य कुटुंबातील युवक-युवतींना मोठय़ा शहरांत राहणे परवडत नसल्याचे त्यांची परवड होत असे. या क्षेत्रात करिअर करणार्‍यांना अभिनयाचे प्रशिक्षण मिळावे, या हेतूने पुणे येथील चॉईस फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूटने औरंगाबाद, नगर, कोल्हापूरसारख्या ठिकाणी अभिनयाचे कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी पत्रकार परिषदेत संस्थेचे संचालक प्रताप देशमुख म्हणाले, अभिनयाचे गुण असतानाही शास्त्रशुध्द अभ्यासाअभावी अनेक तरूण-तरूणींना चित्रपट क्षेत्रात संधी मिळत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे कोर्स नगरमध्ये सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. चॉईस फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट मागील आठ वर्षांपासून चित्रपट निर्मितीत कार्यरत असून या संस्थेने संजय जाधव दिग्दर्शित ‘चेकमेट’, ‘रिंगा-रिंगा’ व गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘दांडगी मुले’, ‘अजिंक्य’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. संस्थेच्या ‘शाळा’ या चित्रपटास नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. येत्या वर्षभरात संस्था ‘आरव्यक’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. बर्‍याचदा ऑडिशनच्या नावाने लोकांची फसवणूक होते. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून, भविष्यात कथा व पटकथा लेखनाचे ही प्रशिक्षण देण्याचा आमच्या संस्थेचा प्रयत्न राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ऑडिशनची माहिती एसएमसद्वारे
चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते या कोर्समध्ये मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई, पुण्यातील ऑडिशन्सची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे दिली जाईल. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थांना चित्रपट व मालिकांत संधी उपलब्ध होणार आहे. शनिवारी व रविवारी हे प्रशिक्षण दिले जाईल. कोर्सचे शुल्क पाच हजार रूपये आहे. कोर्स 5 ऑक्टोबरपासून पटवर्धन स्मारक येथे सुरू होणार आहे.
-प्रताप देशमुख, संचालक

रविवारी मोफत सेमिनार
नगरमध्ये अशा प्रकारचे अभिनयाचे कोर्स सुरू व्हावेत, अशी माझी इच्छा होती. हे कोर्सेस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्याने घेण्यात येणार आहेत. कोर्सची माहिती देण्यासाठी रविवारी (29 सप्टेंबर) रावसाहेब पटवर्धन स्मारकात सायंकाळी पाच वाजता मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ऋषिकेश करमाळकर यांच्याशी 8237770071 या क्रमांकावर संपर्क साधावा.
- तिलोत्तमा कांबळे, समन्वयक