आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत बांधकामांवर हातोडा अनिवार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर-मनमाड राज्य महामार्गावरील दोन्ही बाजूस असलेली 205 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याशिवाय महापालिकेकडे आता पर्याय राहिलेला नाही. कारण अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्याच्या तरतुदीचा नगररचना कायद्यात समावेश झाल्यामुळे ही बांधकामे नियमित करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. अनधिकृत बांधकाम करणार्‍यांत बडे लोक सहभागी आहेत. ही मंडळी आता काय करतात व मनपाचे अधिकारी कोणती कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नगर-मनमाड महामार्गावरील बिल्डिंग लाइनच्या (कंट्रोल लाइन) आत असलेल्या बांधकामांचे सव्र्हेक्षण नुकतेच पूर्ण झाले. अनधिकृत बांधकामांची यादी ‘दिव्य मराठी’ला मिळाली आहे. त्यानुसार हा रस्ता जीवघेणा होण्यास ही 205 अनधिकृत बांधकामे कशी कारणीभूत आहेत, हे स्पष्ट होते. मनपाच्या नगररचना विभागाने फक्त यादी तयार करून ठेवली आहे. मात्र, त्याबाबत काहीच कारवाई केलेली नाही. ही बांधकामे नियमित करण्याचा मनपा अधिकार्‍यांचा प्रयत्न असल्याची माहिती समजली. पण, नगररचना कायद्यातील तरतुदीमुळे ते आता शक्य होणार नाही. ही सर्व अतिक्रमणे, प्रामुख्याने तळघरांचा व्यावसायिक वापर, अनधिकृत शेड, पक्की बांधकामे व पार्किंगची सुविधा नसणे अशा प्रकारची आहेत.

पार्किंग नसल्याने वाहने थेट रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे चौपदरी रस्त्याचा संकोच होऊन अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अनधिकृत बांधकामे होत असताना मनपाच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले. रस्त्याच्या पूर्वेस 94 व पश्चिमेस 111 बांधकामे विनापरवाना असल्याची यादी मनपाच्या नगररचनाने तयार केली आहे. अनधिकृत बांधकाम करणारे सर्वजण व्यावसायिक आहेत. सर्व बांधकामे रस्त्याच्या मध्यापासून 37 मीटरच्या आत आहेत.

अधिकार्‍यांवर कारवाई करा
अनधिकृत बांधकामांवर योग्य वेळेत कारवाई न केल्यामुळे अधिकार्‍यांनी आपल्या सेवाशर्तींचा भंग केला आहे. ज्यांच्या काळात ही बांधकामे झाली, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. खरेतर आयुक्तांनी अशी जबाबदारी निश्चित करून सरकारकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते. ’’ शशिकांत चंगेडे, अध्यक्ष, नागरिक कृती मंच, नगर.

प्रभाग अधिकार्‍यांकडे प्रस्ताव
नगर-मनमाड रस्त्यावरील सर्व अनधिकृत बांधकामांचा सव्र्हे करण्यात आला असून तसा प्रस्ताव संबंधित प्रभाग कार्यालयाकडे देण्यात आला आहे. सव्र्हे करताना अतिक्रमण असलेल्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. अतिक्रमण किती आहे, कोणत्या प्रकारचे आहे. याचा तपशील प्रस्तावात देण्यात आला आहे. त्यामुळे सावेडी प्रभाग कार्यालयाने सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. विश्वनाथ दहे, नगर रचनाकार

अनधिकृत बांधकाम करणारे मोठे लोक/भोगवटाधारकाचे नाव
पूर्व भाग
1) कोहीनूर प्लाझा
2) पराग प्लाझा
3) अँडव्हेंचर टॉवर
4) कृष्णकुमार धूत कॉम्प्लेक्स
5) कामदा हाऊस
6) श्रध्दा प्युवरव्हेज
7) स्मिता अपार्टमेंट
8) ड्रिमलॅण्ड अपार्टमेंट
9) हिमालय टॉवर
10) दीपक पेट्रोलपंप
11) रुचिरा स्विट
12) झोपडी कॅन्टीन
13) तलाठी संघाचे माऊली संकुल
14) डिलक्स वाईन्स
15) महेंद्र पेढेवाला
16) हॉटेल अंबर
17) गायकवाड सांस्कृतिक भवन
18) हॉटेल कीर्ती
19) कल्पतरू ऑटोमोबाईल्स
20) रेणावीकर हाईटस्
21) अनुज मित्तल टॉवर्स
22) मॉडर्न कन्स्ट्रक्शन
23) मनोरत हौसिंग सोसायटी
24) हॉटेल पंचशिल
25) हॉटेल पुष्कराज
26) पुरोहित मार्बल
27) हुंडेकरी मोटर्स
28) हॉटेल संजोग
29) सूरज हाईटस्

पश्चिम भाग
1) हॉटेल ओबेरॉय : (भोगवटादार : दामोदर बिर्याणी हाऊसचे मालक राजेंद्र ससे)
2) मोहन व नवनीत गांधी (कर्जकर फायनान्स)
3) रुचिरा स्वीटस्
4) हॉटेल प्रेमसागर
5) रॉयल आईस्क्रीम (कुकरेजा)
6) शिंदे डिपार्टमेंटल स्टोअर
7) सावंत लॉजिस्टिक सर्व्हिसेस
8) शिवम टीव्हीएस
9) बँक ऑफ महाराष्ट्र, सुविधा स्टोअर (एम. डी. सचदेव)
10) जगधने (स्वर्णाकार डेकोअर)
11) किसनराव फुलारी
12) स्वीट होम (गणेश बोगावत)
13) हॉटेल प्रेमदान (सुनीलकुमार नहार)
14) बिगबाजार - विनापरवाना पत्राशेड
15) मारुती सुझुकी (कांकरिया ऑटोमोबाईल्स)
16) संत नागेबाबा सोसायटी
17) रोहन एन्टरप्रायजेस (खंडेलवाल फर्निचर)
18) साईदीप, देसी तडका, थाटबाट (नीलेश चोपडा)
19) हॉटेल परिचय (बोरुडे)
20) राजहंस खंडेलवाल
21) मनपाची शाळा
22) गिरिजा मोटर्स (कुकरेजा)
23) यश अपार्टमेंट (यशवंतराव गडाख व इतर)
24) विलास वाकळे (सर्मथ मोटर्स)
25) भिल्ल वस्ती
26) यात्री फास्टफूड (हॉटेल वैष्णवी)
27) गुरू फर्निचर (मनोहर मंगतराम गाबरा)
28) जुने सत्यम हॉटेल
29) साई टायर्स (श्रीकांत वाकळे, विजय वाकळे)
30) अभिषेक मार्बल
31) विशाल मार्बल (विशाल बक्षी)
32) रावसाहेब अनभुले होमिओपॅथी कॉलेज
33) मेघनंद हॉटेल
34) हॉटेल चंद्रा
35) वैष्णवी हाईटस
36) राजुरी स्टील
37) हॉटेल सर्मथ
38) शिवनेरी हॉटेल
39) अभिविश्व कॉम्प्लेक्स
40) चैतन्य क्लासिक हॉटेल
41) अंबिका स्वीटस
42) हॉटेल रूपाल