आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगाव: बोभाटा झाल्यानंतर केली वाळूच्या डंपरवर कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव​ - मावा कारखान्यावरील बनावट छाप्याचे प्रकरण ताजे असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर सोडून दिले. मात्र, बोभाटा झाल्याने गुरुवारी रात्री उशिरा सव्वाच्या सुमारास हे डंपर पकडून आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ पथकावर आली. 
 
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मिरी रस्त्यावरील खाणीजवळ मातीमिश्रित वाळूच्या डंपरमध्ये पाणी टाकण्याचे काम सुरू होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तेथे आले. आर्थिक तडजोड झाल्याने हे पथक तेथून निघून गेले. काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला शेवगावचे पोलिस ठाणे गाठले. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या वरिष्ठांशी संपर्क साधत घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. हे प्रकरण अंगलट येईल हे लक्षात आल्याने नगरकडे रवाना झालेले पथक पुन्हा मागे फिरले. त्यांनी दोन डंपर पोलिस ठाण्यात आणून तिघांवर गुन्हा दाखल केला. 
 
मध्यरात्री १.१४ वाजता डंपर (एमएच १२ एजी ३९४१) एक विनाक्रमांकाच्या प्रत्येकी चार ब्रास वाळू असा १० लाख २४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करुन प्रमोद मोहन गर्जे, अशोक सुभाष दरक, सोमनाथ चांगदेव कोहक या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...