आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला जाणारा ‘कार्यक्षम आमदार’ हा पुरस्कार माजी मंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांना जाहीर झाला. नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ८ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. माजी आमदार, लेखक आणि दिवंगत पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १३ वर्षांपासून सार्वजनिक वाचनालय कार्यक्षम लोकप्रतिनिधींचा गौरव करून त्यांना हे पुरस्कार दिले जातात. लिमये यांच्या कन्या डॉ. शोभा व जावई विनायक नेर्लीकर यांनी दिलेल्या देणगीतून या पुरस्काराचे वितरण होते. आमदार जयप्रकाश छाजेड, पत्रकार वंदन पोतनीस, डॉ. विनायक व शोभा नेर्लीकर, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागीरदार यांच्या निवड समितीने पुरस्कारासाठी थोरात यांची निवड केली.

पुढे वाचा थोरात यांनी दिली विविध योजनांना गती