आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Activist Fire Madhukar Pichad Photo Frame, News In Marathi

धनगर समाज आरक्षणाला विरोध केल्याचे, साकूरमध्ये मंत्री पिचड यांचा पुतळा जाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - धनगर समाजाचा भटक्या प्रवर्गाऐवजी आदिवासींमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी होत असताना धनगर समाजाच्या समावेशासाठी विरोधाची भूमिका घेणा-या आदिवासी विकास व पालकमंत्री मधुकर पिचड यांचा पुतळा साकूरमध्ये घोषणाबाजी व निषेध करत संतप्त धनगर समाजाच्या नागरिकांनी जाळला. पिचड यांच्या पाठीशी गेली अनेक वर्षे असलेल्या साकूरमधूनच आता त्यांना घरचा आहेर देण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचा भटक्या प्रवर्गातून आदिवासींमध्ये समावेश करण्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी या निर्णयाला अनुकूलता दाखवली असतानाच त्यांच्या या निर्णयाला विरोध करत पिचड व क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली. साकूरमध्ये धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. राज्यभर धनगर समाजाच्या आदिवासींमध्ये समावेशासाठी आंदोलने सुरू असताना पिचड यांच्याविरोधात तालुक्यातील धनगर समाज एकवटला आहे.
गुरुवारी आरक्षणाला विरोध करणा-या पालकमंत्री पिचड यांच्याविरोधात साकूरमध्ये घोषणाबाजी व निषेध करत संतप्त समाजाच्या नागरिकांनी पुतळा जाळला.
या आंदोलनाच्या वेळी पठार भाग धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष मल्हारराव होळकर, राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बुवाजी खेमनर, आश्वीचे सरपंच भारत ज-हाड, लहानू खेमनर, कोंडाजी खेमनर, डॉ. सुनील मेहेर, रंगनाथ सोडनर, रामदार खेमनर, एकनाथ धुळगंड आदी उपस्थित होते.

अनेक वर्षे केली पिचड यांची पाठराखण
साकूर भाग गेल्यावेळी मतदारसंघ पुनर्रचनेत विधानसभा निवडणुकीपासून संगमनेर मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यापूर्वी हा भाग अकोले मतदारसंघात येत होता. या मतदारसंघातून धनगर समाज बांधवांनी सातत्याने मंत्री पिचड यांचीच पाठराखण केली. तालुक्यातील साकूर व घारगाव, बोटा या तालुक्यांवर पिचड यांच्या विजयाची मदार राहिली आहे. सातत्याने पिचड यांच्याबरोबर असलेल्या या समाजाविरोधातच पिचड यांनी थेट भूमिका घेतल्याने धनगर समाजात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.