आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांना खटकतोय राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीला धारेवर धरणाऱ्या भाजपने सत्तेसाठी, काही पण असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. अनेक वर्षांपासून ज्या पक्षाला विरोध करत आलो, तोच आता मित्रपक्ष झाल्याने त्यापेक्षा २५ वर्षांपासूनच मित्रपक्ष असलेली शिवसेना काय वाईट होती का, अशी प्रतिक्रिया अनेक कार्यकर्ते देत आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा प्रुमख मुद्दा हा सिंचन घोटाळा होता. सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते अडकले आहेत. भाजप सत्तेत आल्यास या घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकू, अशी गर्जना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्याबरोबरच तत्कालीन विरोधी पक्षनेते आताचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही सिंचन घोटाळ्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांना लक्ष्य केले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचाराचा मुद्दा हा सिंचन घोटाळा होता. सिंचन घोटाळा भाजपने बाहेर काढल्यामुळे प्रत्येक सभेत, पत्रकार परिषदांमध्ये भाजपचे नेते हे सिंचन घोटाळ्यावर भर देत होते. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीशी संघर्ष केला. ज्या पक्षाबरोबर संघर्ष केला, त्याच पक्षातील नेत्यांबरोबर बसण्याची वेळ भाजप कार्यकर्त्यांवर आली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी फडणवीस सरकारने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठा धक्का ला आहे. सत्ता संघर्षात भाजपने कार्यकर्त्यांचाच नव्हे, तर ज्यांनी निवडणुकीत आघाडी सरकारला कंटाळून भाजपला मते दिली, त्यांचाही विश्वासघात केल्याची टीका खुद्द पक्षातून केली जात आहे. सत्तेसाठी राष्ट्रवादीला बरोबर घेतल्याने पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचे होते, तर निवडणुकीत त्यांच्यापाठिंधात प्रचारच का केला? राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचे होते, तर मग शविसेना काय वाईट होती? अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली, तर अनेक जण राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यामुळे सर्वसामान्यांचा भाजपवरील विश्वास उडाला असल्याचे सांगत आहेत. याबाबत खासदार दिलीप गांधी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तुम्हाला कोण म्हणाले, आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला म्हणून? आमच्या कुठल्या नेत्याने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत चर्चा केली? समोरच्यांनी पाठिंबा देऊ केला म्हणून तो आम्ही घेतला.
राजकारणात सर्व माफ
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नव्हता. राष्ट्रवादीने स्वत:हून भाजपला पाठिंबा देऊ केला. एखाद्या पक्षाने पाठिंबा देऊ केल्यावर त्यांना नाही कसे म्हणायचे? शविसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, तसा प्रतिसाद शविसेनेकडून िमळाला नाही. राजकारणात आजचे शत्रू हे उद्याचे मित्र असतात. प्रेमात आणि राजकारणात सर्वकाही माफ असते. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे यात गैर नाही. त्यामुळे कुणीही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी नाराज नाहीत.”
अनिल गट्टाणी, उपाध्यक्ष, शहर भाजप.

अजूनही आशावादी
विधानसभा निवडणुकीपूर्वी काय झाले ते जाऊ द्या, पण निवडणुकीनंतर शविसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र येणे गरजेचे होते. ज्या पक्षाबरोबर आम्ही संघर्ष केला. त्याच पक्षाला सत्तेत बरोबर घेणे हे चुकीचे आहे. अशी भावना अनेकजण आमच्याजवळ व्यक्त करतात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरच आम्ही निवडणूक लढवली. राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचा निर्णाय हा वरिष्ठ पातळ‌ीवरचा होता. त्यामुळे याबाबत काही बोलणे योग्य ठरणार नाही. युती होईल याबाबत आम्ही अजूनही आशावादी आहोत.” सुरेखा विद्ये, सदस्य, प्रदेश महिला आघाडी.

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का
जो वर्षानुवर्षे भाजपचा मित्रपक्ष राहिला, त्या शिवसेनेबरोबर युती होणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणुकीआधी कोण काय बोलले, हे विसरून भाजप-शविसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व मतभेद विसरून शविसेनेला भाजपने सत्तेत सहभागी करून घ्यावे. सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणे अत्यंत चुकीचे आहे. राष्ट्रवादी हा विश्वासू पक्ष नाही. राष्ट्रवादीला बरोबर घेतल्यामुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.” प्रा. मधुसूदन मुळे, ज्येष्ठ नेते, भाजप.