आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरी ग्रामीण भाषेमुळे "कुरघोड्या' कथासंग्रह आपला वाटतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ग्रामीण भाषेत लेखन करणारे लेखक कमी आहेत. "कुरघोड्या' हा कथासंग्रहाची भाषा आपल्या नगरची ग्रामीण भाषा आहे. म्हणून हा कथासंग्रह आपला वाटतो, असे प्रतिपादन अभिनेते मिलिंद शिंदे यांनी केले. येथील लेखक किरण बेरड लिखित "कुरघोड्या' या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अभिनेते भारत गणेशपुरे, कथाकार संजय कळमकर, प्रा. मेधा काळे, कथाकथनकार सुभाष काळे, लेखक किरण बेरड आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, हे पुस्तक वाचताना त्यातील सर्व प्रसंग डोळ्यासमोर आणण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
"चला हवा देऊ द्या',"फू बाई फू' फेम हास्य कलावंत अनासपुरे यांनी उपस्थितांना विनोदी किस्से सांगून हसवले. यावेळी त्यांनी वऱ्हाडीशैलीत गावाकडच्या गोष्टींचा संदर्भ दिला. कळमकर यांनी संस्कृती, तरुणपिढी, टिव्ही मालिकात चांगल्या कथा, वाचन कसे आवश्यक आहे हे सांिगतले. श्रीमती काळे म्हणाल्या, पुस्तकातून मनोरंजन तर होतेच, पण लोकांना जागृत करण्याचे कामही "कुरघोड्या'तून होत आहे. लेखक बेरड म्हणाले, चारोळ्या वाचताना त्या िलहायला शिकलो. नंतर वात्रटिका लिहिल्या, झक्कड पक्कड सदर लिहिलं व नंतर लेखनाकडे वळलो. प्रास्तािवक कीर्ती खेडकर यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा पाठक यांनी, तर आभार सुरेख सुंबे यांनी मानले.

पुस्तकात गावाकडची उदाहरणे
"कुरघोड्या'या कथासंग्रहामध्ये ग्रामीण कथांना विशेष महत्त्व दिले आहे. गावामध्ये नवीन व्यक्ती आली, तर तिची सर्व माहिती क्षणातच गावात पसरते. इंटरनेटपेक्षाही येथील प्रसारमाध्यमे वेगवान आहेत. मनोरंजनाची साधने कमी असल्यामुळे एखाद्याची घडलेली न घडलेली अथवा बिघडलेली प्रकरणे चघळत बसणे, पारावर बसलेल्या रिकामटेकड्या लोकांचा छंद. खेड्यातील लोक हुशार व बेरकी असतात. याची उदाहरणे या कथासंग्रहात आहेत.